Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले तोरणा (पुणे)

 किल्ले तोरणा (पुणे)


शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 

किल्ल्याची ऊंची : १४०० 

डोंगररांग : डोंगररांग नाही  

जिल्हा : पुणे 

श्रेणी : मध्यम 


गडावर जाण्याच्या वाटा: पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.


राहण्याची सोय गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय : देवीच्या मंदिर समोरच बारमाही असणाऱ्या  पाण्याचे टांके आहे 

पायथ्याचे गाव: वेल्हे 

वैशिष्ट्य तोरणा किल्ल्याचा विस्तार आणि त्याच बरोबर तेथे असलेल्या लेण्या या वैशिष्ट्यपूर्ण आहे  

Post a Comment

0 Comments